होय, उसेन बोल्ट आजही जगातला सर्वात वेगवान मानव आहे. ज्या दिवशी फेडरर नावाच्या एका चॅम्पियनने सुवर्णपदक गमावलं तेव्हा उसेन बोल्ट नावाच्या दुसर्या चॅम्पियनने लिजंड होण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकलं. त्याने १०० मीटर्सची शर्यत ऑलिम्पिकमध्ये लागोपाठ दुसर्यांदा जिंकली. हा विक्रम आधी फक्त एकाच मानवाला जमलाय. त्याचं नाव कार्ल लुईस. पण त्यावेळी म्हणजे १९८८ साली जमैकाचाच पहिला आलेला बेन जॉन्सन त्याने बंदी असलेलं ड्रग घेतल्याचा आरोप सिद्ध झाल्यामुळे बाद झाला होता. शंभर मीटर्स शर्यतीच्या आयुष्यात ही घटना एकमेव आहे.
बोल्टसह शंभर मीटर स्प्रिंटमधले महारथी जेव्हा स्टार्टिंग ब्लॉक्सवर उभे राहिले तेव्हा संपूर्ण जगाने श्वास रोखून धरला होता. पण डोळे होते दोघांवर. एक बोल्ट आणि दुसरा ब्लेक! एक १०० मीटर्समध्ये सर्वात कमीत कमी वेळ नोंदवणारा मानव (९.५८ सेंकद), दुसरा त्याला अलीकडे आव्हान देणारा त्याचा दोस्त, ट्रेनिंग पार्टनर आणि देशवासीय! बोल्टपेक्षा तरुण आणि ऑलिम्पिक ट्रायलमध्ये बोल्टला हरवून अनेकांच्या आशा पल्लवीत केलेला ब्लेक!
पण बोल्टने दोन गोष्टी सिद्ध केल्या. एक म्हणजे अलीकडे वीरेंद्र सेहवाग, सचिनबद्दल बोलला तसं ‘बेटा, बेटा होता है और बाप बाप! आणि दुसरं म्हणजे अस्सल चॅम्पियन. इतरत्र कुठेही हरो, सर्वोच्च स्टेजवर आपला परफॉर्मन्स असा उंचावतोय की तिथे कुणी पोचत नाही. विव्ह रिचर्डस ते करायचा. पेलेकडे ती कुवत होती. मॅरोडनाकडेसुद्धा वगैरे वगैरे! बोल्ट जिंकल्यावर स्वत: म्हणाला, ‘‘शेवटी ऑलिम्पिक सर्वात महत्त्वाचं. मला ठावूक होतं की, तिथे सर्वोच्च फॉर्म दाखवणार.’’ काही जिभा ‘ब्लेक ब्लेक ब्लेक’ असं स्पर्धेपूर्वी दबकत का होईना पुटपुटत होत्या, त्यावेळीही त्या शर्यतीत कास्यपदक मिळवलेला अमेरिकेचा जस्टीन गॅटलीन म्हणाला होता, अगदी ‘शोले’च्या गब्बरसिंग स्टाइलमध्ये, ‘‘एकच माणूस बोल्टला हरवू शकतो तो म्हणजे स्वत: बोल्ट.’’
शर्यतीच्या बाबतीत स्वत: बोल्टला एकच काळजी होती. त्याचा स्टार्ट! त्याचे एकदा हात पोळले होते. त्याबद्दल केंब्रिज विद्यापीठाच्या जॉन बॅरो या गणितज्ञाने एक गणित उलगडून सांगितलं. गॅनशॉट ऐकल्यानंतर जर एखादा खेळाडू ०.१० सेकंदांत रिऍक्ट झाला, तर तो स्टार्ट अवैध धरला जातो. जे सर्वोत्कृष्ट सुरुवात करणारे असतात ते साधारण ०.१२ सेकंदांत रिऍक्ट होतात. उसेन बोल्ट त्यातला नाही. त्याच्या उंचींमुळे तो किंचित उशिरा रिऍक्ट होऊन सुरुवात करतो. म्हणजे त्याची रिऍक्शन वेळ ०.१५ सेकंद असते. १०० मीटर्सच्या शर्यतीत ०.०३ सेकंदांचा उशीर हा खूप मोठा उशीर झाला. ज्यावेळी बोल्टने २००९ साली ९.५८ सेकंदांत शंभर मीटर्स पार केले तेव्हा त्याचा रिऍक्शन टाइम ०.१५ सेकंद होता. बीजिंगमध्ये त्याने सुवर्णपदक ९.६८ सेकंदांत जिंकलं तेव्हा त्याचा रिऍक्शन टाइम ०.१७ सेकंदांचा होता. म्हणजे आणखी जास्त. जेव्हा बोल्टने ९.५८ सेकंदांचा जागतिक विक्रम केला तेव्हा तो जर इतर चॅम्पियन्सप्रमाणे शक्य असलेल्या ०.१२ सेकंदांत रिऍक्ट झाला असता तर ती शर्यत त्याने ९.४६ सेकंदांत जिंकली असती. कारण तेव्हा हवेचा वेगही सेकंदाला दोन मीटर होता. थोडक्यात टायमिंग किती गोष्टीवर अवलंबून असतं हे पहा.
यावेळीही आकाशातल्या परमेश्वराला वंदन करून त्याने शर्यतीला सुरुवात केली, तेव्हा बोल्टला ब्लॉक्समधून निघायला उशीर झाला. पण त्याच्या लयबद्ध लांब पावलांनी त्याने तो वेळ भरून काढला. साधारण पन्नास मीटरवर तो इतरांच्या किंचित पुढे सरला आणि तिथून पुढे तो जिंकणार ही काळ्या दगडावरची रेष होती. जवळपास एका यार्डाने त्याने ब्लेकला मागे टाकलं. पण बीजिंग ऑलिम्पिकपेक्षा बोल्टला इथे थोडे जास्त कष्ट पडले. कारण त्याला ब्लेकचं आव्हान होतं. बीजिंगला त्याच्या आणि इतर पदक मिळवणार्या धावपटूंत तब्बल ०.२० सेकंदांचा फरक होता. काल लंडनला त्याच्यात आणि ब्लेकमध्ये ०.१२ सेकंदांचा फरक होता. ही शंभर मीटर्सची शर्यत जवळपास चाळीस-एक्केचाळीस पावलांची शर्यत असते. पण एखादा बोल्टसारखा धावपटू ती पावलं लयबद्ध टाकत धावतांना त्याबरोबर त्याच्या हातांची ती तितकीच लयबद्ध होणारी हालचाल यामुळे ते दृश्य डोळ्यात साठवून ठेवावंसं वाटतं. शंभर मीटर्सच्या शर्यतीत डोळ्याची पापणी मिटणं हासुद्धा अडथळाच वाटतो. केनियाच्या जंगलात मी एकदा चित्त्याला धावताना पाहिलं होतं. बोल्टला धावताना पाहून मला त्याची आठवण झाली. कदाचित चित्ताही स्तीमित होऊन बोल्टकडे पाहत बसला असता. जिंकण्याची त्याची ती जिद्द त्याच्या चेहर्यावर स्पष्टपणे लिहिली होती. त्याक्षणी चेहर्यावर एखाद्या स्मितरेषेलाही जागा नव्हती. स्मित नंतर झळकलं, पण आधी चहर्यावर करारी भाव दिसत होते. एखाद्या चॅम्पियनच्या असतात त्याप्रमाणे! बोल्ट हे रॉकेट आहे हे इतरांना ठाऊक हातं. पण तरीही शर्यत वेगात झाली. अंतिम फेरीत जे सर्व धावपटू होते ते प्राथमिक फेरीत शर्यत १० सेकंदांच्या आत जिंकले होते आणि अंतिम फेरीत असाफा पॉवेल सोडला तर सर्वांनी शर्यत १० सेकंदांच्या आत पूर्ण केली. पॉवेल जर धावताना जायबंदी झाला नसता तर कदाचित एक वेगळा विक्रम झाला असता.
महान खेळाडूंचा आत्मविश्वास मला नेहमीच मोहित करतो. त्याचं अलीकडचं हरणं, त्याचा फिटनेस वगैरे अनंत प्रश्न उभे राहूनही बोल्टच्या तोंडातून एकही निराशेचा सूर निघाला नाही. जिंकल्यावरही तो फार नम्र वगैरे नव्हता. त्याचा सर्वसाधारण आर्विभाव मी जिंकणार हे माहीतच होतं असा होता. तो म्हणाला, ‘‘मी लिजंड होण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकलंय. गुरुवारी जर मी २०० मीटर्सची शर्यत जिंकली तर लिजंड नक्की होईन कारण असा पराक्रम कुणीही केलेला नाही. मी आजही नंबर वन आहे. हे माझ्या टीकाकारांना दाखवायला मला आवडेल.’’
विजयाप्रमाणे उद्धटपणाही अस्सल चॅम्पियनलाच शोभतो.

No comments:
Post a Comment